मनाई आदेश लागू

Edited by: संदीप देसाई
Published on: October 22, 2024 13:54 PM
views 16  views

सिंधुदुर्गनगरी : निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे 269 कुडाळ विधानसभा मतदार संघाकरीता विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटार गाड्या वाहने यांचा समावेश नसावा अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. 

त्याअनुषंगाने  पोलीस निरीक्षक कुडाळ यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता प्रक्रिया संहीता 2023 चे कलम 163 नुसार मनाई आदेश लागू करण्याची विनंती केली आहे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. आणि सर्व संबंधीतांना नोटीस देवुन त्यांचे म्हणने ऐकुन घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता प्रक्रिया संहीता 2023 चे कलम 163 नुसार एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे.

कुडाळ निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीम ऐश्वर्या काळुशे यांनी  भारतीय नागरीक सुरक्षा संहिता प्रक्रिया संहीता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून असे आदेश देत आहे की, निवडणूकीचे कालावधीत 269 कुडाळ विधानसभा मतदान संघात सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे,वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

हा मनाई आदेश दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 चे रात्री 12 वाजले पासुन दिनांक 4 नोव्हेंबर 2024 चे रात्री 12 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी 269 कुडाळ विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालयाच्या 100 मी. परीसरात अंमलात राहील.