राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धेत सासोलीतील अस्मी धाऊसकरने पटकाविला प्रथम क्रमांक

Edited by: संदीप देसाई
Published on: July 03, 2023 13:07 PM
views 115  views

दोडामार्ग : मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती कला अकादमीने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय चित्रकला रंगभरण स्पर्धेत सासोली हेदूस वाघमळा शाळेच्या इयत्ता २री मध्ये शिकणाऱ्या कु. अस्मी हर्षद धाऊसकर हिने इयत्ता१ ली ते २री गटातून राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केला. 

   तिच्या या राज्यस्तरीय यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आषाढी एकादशी निमित्त आयोजित रांगभरण स्पर्धेत तिने विठ्ठलाचे मनमोहक रूप साकारत प्रथम क्रमांक पटकाविण्याची किमया साधली. तिला तिच्या प्रशालेतील शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन लाभले. माजी सभापती दयानंद धाऊसकर आणि सासोली गावच्या माजी सरपंच दिपाली धाऊसकर यांची ती नात आहे. तिच्या या यशाबद्दल सासोलीवासियांतून विशेष अभिनंदन होत आहे.