असलदे ग्रामपंचायतला स्व. वसंतराव नाईक पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्गात शौचालय व्यवस्थापन जिल्हास्तर स्पर्धेत मिळवले यश
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 11, 2023 14:39 PM
views 87  views

कणकवली : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२०-२०२१ व २०२१-२०२२ शौचालय व्यवस्थापन या विषयात जिल्हास्तर स्पर्धेत कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत असलदे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल  स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन)विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे .अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधीकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, वितलेखा अधिकारी श्रीमती गावडे यांच्या हस्ते सरपंच चंद्रकांत डामरे, माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, असलदे ग्रामपंचायत सदस्य दयानंद हडकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके, सदस्य आनंद तांबे, ग्रामसेवक संजय तांबे आदी उपस्थित होते.