वैद्यकीय महाविद्यालयातील समस्यांबाबत वैभव नाईकांनी विचारला जाब

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 06, 2023 16:57 PM
views 281  views

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणि जिल्हा रुग्णालयातील अनेक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केला आहे. या महाविद्यालयासाठी ९०० कोटींचे बजेट मंजूर असताना देखील आणि सताधाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील ३ मंत्री असताना देखील महाविद्यालयाच्या नवीन वस्तूची अद्याप एकही विट लागली नाही जिल्ह्यासाठी शोकांकिता असल्याचे सांगत कोणी एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण संख्या वाढविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून या महाविद्यालयाकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप आज आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यामधील विविध प्रकारच्या समस्यांबाबत आमदार वैभव नाईक यांनी महाविद्यालयाचे डीन डॉ. सुनिता रामानंदा यांची भेट घेत याबाबत जाब विचारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नागेश ओरोसकर, राजेश काविटकर, मनीष पारकर आदी उपस्थित होते. यावेळी आ.नाईक म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. २०२० पासून या कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. मात्र विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली प्राध्यापकांची पदे भरण्यात आलेली नाही. १५ पैकी केवळ ४ प्राध्यापक पदे भरण्यात आली असून ११ पदे रिक्त आहेत. तर सहयोगी प्राध्यापकांची २७ पदे मंजूर असून ११ भरलेली आहेत व १६ रिक्त आहेत. सहाय्यक प्राध्यापकांची ३८ पदे मंजूर असून केवळ ८ पदेच भरण्यात आली आहेत. तर ३० पदे रिक्त आहेत. अशा रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे. तसेच या महाविद्यालयातील अन्य डॉक्टर, स्पेशालिस्ट डॉक्टर यांचीही पदे रिक्त असल्याने रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही. रुग्णांना अन्य रुग्णालयात दाखल केले जात आहे. याबाबत डीन यांना विचारले असता त्यांनी ही परिस्थिती मान्य केली असल्याचे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आणि जिल्हा रुग्णालयातील अनेक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची परवड होत आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केला आहे. या महाविद्यालयासाठी ९०० कोटींचे बजेट मंजूर असताना देखील आणि सताधाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील ३ मंत्री असताना देखील महाविद्यालयाच्या नवीन वस्तूची अद्याप एकही विट लागली नाही जिल्ह्यासाठी शोकांकिता असल्याचे सांगत कोणी एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण संख्या वाढविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून या महाविद्यालयाकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप आज आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

डीन व सीएस यांच्यामधील वादामुळे शस्त्रिकिया रखडल्या

        वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता आणि जिल्हा रुग्णालयाच्या शक्य चिकित्सक यांच्यामध्ये वाद आहेत. या वादामुळे या ठिकाणी शस्त्रिकीया होत नसल्याचा आरोप देखील आ. नाईक यांनी केला.

कारभार सुधारावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणे

    वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्गातील सर्वसामान्य जनतेची लाईफ लाईन आहे. मात्र याकडे सत्ताधाऱ्यांचा दुर्लक्ष होतं आहे. जिल्ह्यातील मंत्री महाविद्यालयाकडे कानडोळा करीत आहेत. मात्र सर्व सामान्य नागरिकांसाठी या महाविद्यालयातील कारभार सुधारा यासाठी राजकारण न करता  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.