
देवगड : देवगड तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक तेली तर सचिवपदी विजय शेटये यांचीबिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी नारायण हिंदळेकर, खजिनदारपदी दत्ताराम शेलार, सहसचिवपदी महेश मोंडकर, प्रशांत तेली, सहखजिनदारपदी विजय तेली, सल्लागारपदी तुकाराम तेली, संचालकपदी नरहरी तेली, अजय तेली, मधुकर कुवळेकर, पुंडलिक शेटये, अविष्कार शेटये, सौ. शुभांगी तेली, महेश पेटकर, सौ. दीक्षा हिंदळेकर, समीर हिंदळेकर, राजेंद्र रहाटे, प्रभाकर आप्पा तेली, उमेश गवाणकर, सुधीर ताम्हाणकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
तेली समाज मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा अशोक तेली यांच्या अध्यक्षतेखाली तळेबाजार येथे रविवार, दि. 7 डिसेंबर 2025 रोजी पार पडली. यावेळी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
या सभेचे प्रास्ताविक नारायण हिंदळेकर यांनी केले. सभेत मागील जमाखर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच नवीन उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. अशोक तेली यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या वेळी आभार प्रदर्शन सचिव विजय शेटये यांनी केले










