सावंतवाडी युवासेना तालुका प्रमुखपदी आशिष सुभेदार

Edited by: विनायक गांवस
Published on: November 14, 2025 16:15 PM
views 150  views

सावंतवाडी : सावंतवाडी उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सावंतवाडी तालुका युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. 

सावंतवाडी  नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांचे अर्ज भरण्याकरिता आयोजित केलेल्या सभेत त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर सावंतवाडी तालुक्याची युवासेना तालुकाप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली असून ही नेमणूक ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर उपनेत्या जान्हवी सावंत संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट महिला जिल्हाध्यक्ष श्रेया परब यांच्या एकमताने करण्यात आली आहे. मागील अनेक वर्ष त्यांचे कार्य अहवाल पाहता पक्षाने युवासेना तालुकाप्रमुख पदाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. निवडणुकांच्या धर्तीवर जी जबाबदारी पक्षाने दिली आहे ती सांभाळून तालुक्यातील युवा सेना संघटना वाढीवर येत्या काही दिवसात भर देणार आहे असे आश्वासन आशिष सुभेदार यांनी देत वरिष्ठ नेत्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचेही आभार असून शिवसेना पक्ष वाढीसाठी योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.