असनियेत 'गरुडझेप' ऐतिहासिक नाटक

Edited by: विनायक गांवस
Published on: May 10, 2025 14:23 PM
views 52  views

सावंतवाडी : असनिये येथील छत्रपती माध्यमिक विद्यालयाच्या रंगमंचावर शनिवार, १० मे रोजी रात्री ८.३० वाजता 'गरुडझेप' हे दोन अंकी ऐतिहासिक नाटक होणार आहे.

कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रस्तुत व युवराज मंगेशकर दिग्दर्शित छत्रपती शिवरायांच्या आग्राहून सुटकेचा थरार असलेला 'गरुडझेप' हा दोन अंकी नाट्यप्रयोग आहे. या ऐतिहासिक नाटकाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवतेज मंडळ व ग्रामस्थांनी केले.