असलदेत शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती

Edited by:
Published on: July 18, 2024 10:24 AM
views 449  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे दिवानसानेवाडी येथील शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर ( वय ७८ वर्षे ) हे १७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास शेतीच्या कामासाठी शेतात गेले असताना अद्यापही परतले नाहीत. दरम्यान, त्यांची छत्री शेती लगत असलेल्या पियाळी नदीकाठी आढळून आल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पोलीस उपनिरिक्षक राजकुमार मुंडे , निवासी नायब तहसिलदार मंगेश यादव ,असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वायंगणकर , मंडल अधिकारी ए.आर.जाधव, तलाठी प्रविण लुडबे, पोलीस पाटील सावित्री पाताडे , कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , शामराव परब, उदय परब, बाबाजी शिंदे ,महादेव परब, प्रदिप हरमलकर, दिनेश शिंदे , मधुसुदन परब , विजय परब , हरिश्चंद्र जांभळे , सतिश पांचाळ ,संतोष घाडी ,श्रीकृष्ण परब , सुभाष परब , रोहीत परब, गोपी परब , कृष्णा परब , अनिल परब, कोतवाल मिलींद तांबे , ग्रामसेवक संजय तांबे, तोंडवली पोलीस पाटील समीर मयेकर आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान , धाकू मयेकर यांची छत्री घरापासून जवळ असलेल्या असलदे दिवाणसानेवाडी पियाळी नदीच्या काठावर आढळून आली. त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन पथक सकाळीच दाखल झाले होते. असलदे गावातील ग्रामस्थांनी काल रात्री व सकाळी नदीलगत शोधमोहीम राबवली . मात्र, अद्यापही धाकू मयेकर यांचा शोध लागला नाही. त्यामुळे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी सकाळी पियाळी नदी किना-यावर भेट दिली. श्री. देशपांडे यांनी नदीलगत असलेल्या सर्व गावांच्या पोलीस पाटील व देवगड तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला नापत्ता श्री. मयेकर यांच्या संदर्भात संदेश देतो. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे शोधकार्यात अडचणी आहेत. प्रशासन याबाबत सतर्क राहिल. तलाठी व मंडल अधिकारी आपल्या संपर्कात राहतील असे आश्वासन दिले. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात धाकू मयेकर हे नापत्ता झाल्याची खबर समीर जगन्नाथ मयेकर राहणार बावशी गावठणवाडी यांनी दिली आहे.