तब्बल १८५५ दिव्यांगांना लाखोंचे साहित्य मोफत वाटप!

रोटरी क्लब ऑफ मुंबई, गोरेगाव वेस्ट सिंधुदुर्गातील अपंगांसाठी बनली देवदूत
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 16, 2022 17:25 PM
views 394  views

सावंतवाडी : समाजात आजही 'दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील, तो ते लाहो प्राणी जात..!' या पसायदानाच्या ओळी सार्थ करणारे दानशूर व्यक्तिमत्व शिल्लक आहेत. अभिमानाची बाब म्हणजे त्याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब दिव्यांग बांधवांना होतो आहे, ही नक्कीच समाजातील सर्वांना सकारात्मक ऊर्जा देणारी बाब आहे. अशीच दानशूरता रोटरी क्लब ऑफ मुंबई, गोरेगाव वेस्ट यांच्या तमाम शिलेदारांनी दाखवली आहे. जागतिक दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ मुंबई, गोरेगांव वेस्ट सिंधुदुर्गातील सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या सहकार्याने व्हिल चेअर, वॉकर, कुबड्या, अंध काठी, साधी स्टिक व ट्रायपॉड स्टिक असे दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम साहित्य वाटपाचा कार्यक्रम काळेपाणी-पिंगुळी येथे संपन्न झाला.

रोटरी क्लब ऑफ मुंबई, गोरेगांव वेस्टचे अध्यक्ष संदीप सावंत यांच्याप्रमुख उपस्थितीत व माजी अध्यक्ष पुष्कराज कोले, माजी अध्यक्ष बापू गिरप व राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील या प्रमुख अतिथींच्या व रोटरी गोरेगांवचे सदस्य यांच्या हस्ते सर्व साहित्य वाटप करण्यात आले.

 यावेळी गोरेगाव रोटरीचे आनंद जैन, सेक्रेटरी भावेश शहा, अशोक भिमरा, उदयकुमार देसाई, असिस्टंट गर्व्हनर अपर्णा गरूड, गौरी सावंत, सोनल शहा, मनिज्ञ भिमरा, शारदादेवी पाटील, प्रा. रूपेश पाटील, ज्ञानदीप मंडळाचे संस्थापक वाय. पी. नाईक, कार्याध्यक्ष निलेश पारकर व सिंधुदुर्गातील असंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते.

कै. ओ. पी. जिंदाल यांचे स्मरणार्थ संगीता जिंदाल या जे. एस. डब्ल्यू फाऊंडेशनच्या माध्यमातून रोटरी गोरेगाव वेस्ट यांना १०० व्हिल चेअर दिल्या जातात. रोटरी गोरेगावचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्गचे सुपुत्र पुष्कराज कोले, बापू गिरप यांच्या प्रयत्नातून बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्याने गेली नऊ वर्षे विविध कृत्रीम साहित्य सिंधुदुर्गाती सर्व प्रकारच्या दिव्यांगांना मोफत उपलब्ध करून देत आहेत.

आतापर्यंत रोटरी गोरेगांव वेस्टच्या माध्यमातून ३० लाख रूपयांपेक्षा जास्त रकमेचे व १८५५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांगांना मोफत साहित्य देण्याचा विक्रम केला आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी शोधने व निवडने या कामी पुष्कराज कोले व बापू गिरप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील हे गेली नऊ वर्षे सिंधुदुर्गातील गरजू व गरीब दिव्यांगांना शोधून त्यांना मोफत साहित्य मिळवून देत आहेत.

 सदर कार्यक्रमात २२ व्हिलचेअर, ५ वॉकर, ४ कुबडी जोड, २० अंध काठी, ४ साधी स्टिक असे एकून ५५ दिव्यांगांना साहित्य वाटप काण्यात आले. रोटरी गोरेगाव वेस्टच्या या सामाजिक कार्याबद्दल ऑनररी कॅप्टन आबा पाटील फाऊंडेशन कडगांव यांचे वतीने सर्व रोटरीयन्सचे 'ऋणानुबंध' सन्मानचिन्ह देवून फाऊंडेशनच्या अध्यक्षा शारदादेवी पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रोटरीच्या वतीने फाऊंडेशनच्या शारदादेवी पाटील यांना साडी, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर महासंघाच्या भक्ती सामंत, उमेश कदम यांचा ही शाल, श्रीफळ व प्रत्येकी रोख एक हजार रूपये देऊन कार्याचा गौरव केला. तर सुचिता कारूडेकर (जी. डी. आर्ट) हिचा सन्मान फाऊंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह तर पुष्कराज कोले यांचेकडून रोख ५००१/ रुपये देऊन गौरव केला.

दिव्यांगांना असणाऱ्या शासनाच्या सोयी-सवलती व त्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच दिव्यांगांच्या बचत गटाविषयी सविस्तर माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली. प्रास्ताविक बापू गिरप यांनी केले. आभार संदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमास महासंघाचे उमेश कदम, भक्ती सामंत, संतोष सामंत, सुधाकर घोगळे, अल्लाबक्ष शेख, सबीना शेख, दिलीप मालंडकर, एकनाथ हरमलकर, प्रशांत कांबळे, राकेश पारधी, मयुरी माळकर, श्रावण कांडरकर, पुजा धुरी, अजित साळगांवकर, देवदत्त माणगावकर, संगीता पाटील, संदीप पाटील, शिरीष पाटील, दत्ता पन्हाळकर, विजय चौगुले, उमेश इंगळे यांचेसह दिव्यांग बांधव उपस्थित होते. दरम्यान, ज्या नवीन दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर, वॉकर, कुबड्या, अंधकाठी, साधीकाठी हवी असतील,

त्यांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत बाळासाहेब पाटील (मो.क्र. ९७६७८०००१०) यांचेकडे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.