मुलगा म्हणून निलेशजी तुमचं 'ते' भाषण योग्यच

जेष्ठ नागरिक महेश परब यांनी केले कौतुक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 28, 2024 10:47 AM
views 142  views

मालवण : गुहागर मध्ये तुमच्या भाषणावर टिका झाली. परंतु एक मुलगा म्हणून तुम्ही योग्यच भाषण केले. वडिलांवर जर खालच्या शब्दात टिका होत असेल तर कोणीही ऐकून घेणार नाही. त्यामुळे तुमचे भाषण मुलगा म्हणून योग्य होते अशा शब्दात जेष्ठ नागरिक महेश परब यांनी माजी खासदार निलेश राणे यांचे कौतुक केले. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर कणकवलीत येऊन आक्षेपार्ह शब्दात टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून राणेंचे ज्येष्ठ सुपुत्र, माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधवांच्या गुहागरात जाहीर सभा घेऊन त्यांच्या भाषेच्या तोडीस तोड असे उत्तर दिले. या सभेतील निलेश राणे यांच्या भाषाशैली वरून राजकीय विरोधकांनी टीका टिप्पणी केली होती. या घटनेला पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. रविवारी मालवणच्या भाजपा कार्यालयात "मन की बात" कार्यक्रमासाठी निलेश राणे आले असता जेष्ठ नागरिक असलेले महेश परब यांनी निलेश राणे यांच्याशी संवाद साधताना गुहागर मधील "त्या" भाषणाची आठवण काढली. निलेशजी त्या भाषणाला कोणीही काही म्हणोत, पण मुलगा म्हणून तुम्ही त्यावेळी घेतलेली भूमिका अतिशय कौतुकास्पद होती. माझ्या वडिलांना कोणी शिव्या दिल्या, त्यांच्याबाबत वाईट उदगार काढले. तर मी देखील असाच रिऍक्ट झालो असतो. त्यामुळे तुमचा आवेश बघून मुलगा म्हणून तुमच्या भूमिकेचा मला आदरच वाटला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

भाजपा नेते निलेश राणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम पाहण्यासाठी मालवणच्या भाजपा कार्यालयात आले होते. हा कार्यक्रम संपल्यावर एका छोटेखानी सत्कार कार्यक्रमासाठी महेश परब हे येथे आलो होते. त्यावेळी निलेश राणे यांच्याशी गप्पा मारताना परब यांनी गुहागर मधील त्या भाषणाची आठवण काढून कौतुक केले. एक मुलगा म्हणून तुमच्या कडून आलेली प्रतिक्रिया कौतुकास्पद अशीच होती, असे सांगून निलेश राणे यांच्या कामाचे देखील त्यांनी कौतुक केले.