तिकीट मिळण्यासाठी अरविंद रावराणेंची नाईकांवर टीका : रोहीत पावसकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 18, 2023 20:52 PM
views 261  views

वैभववाडी :  आगामी निवडणुकीत उमेद्‌वारी मिळावी यासाठीची अरविंद रावराणे यांची धडपड सुरू आहे.सध्या त्यांना भाजपात कोणीही विचारत नसल्याने त्यांनी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्यावर  टिका केली आहे.अशा शब्दात युवासेनेचे विभागप्रमुख रोहीत पावसकर यांनी श्री रावराणे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. 


ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री.नाईक यांनी येथील ग्रामीण रूग्णालयाला भेट दिल्यानंतर आमदार नितेश राणेंवर टिका केली होती.त्यानंतर माजी सभापती अरविंद रावराणे यांनी श्री.नाईक यांच्यावर टिका केली होती.दरम्यान आता युवासेनेचे विभागप्रमुख यांनी प्रसिध्दपत्रकातुन श्री.रावराणे यांच्यावर टिका केली आहे.त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.श्री.रावराणे यांनी आपले भाजप पक्षातील स्थान काय आहे हे पाहावे.केवळ वरिष्ठांना खुश करण्यासाठी टिका करू नये.ग्रामीण रूग्णालयातील समस्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी श्री.नाईक यांच्यासमोर मांडल्या आहेत.त्यामुळे अपुऱ्या माहीतीच्या आधारे श्री.नाईक यांनी टिका केली असे म्हणणेच चुकीचे आहे.महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष होते.परंतु तत्पुर्वी गेली अनेक वर्ष या जिल्हयावर नारायण राणेंचीच सत्ता होती.गेली नऊ वर्ष नितेश राणे आमदार आहेत.याचा विसर श्री.रावराणेंना सोयीस्कर पडला आहे.आमदारांनी ग्रामीण रूग्णालयाकडे लक्ष का दिले नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.डिझेल नसल्यामुळे जनरेटर बंद,रूग्णवाहीका बंद,आर्थींग नसल्यामुळे रक्ततपासणी मशीन बंद,ही स्थिती कुणामुळे आली याचा विचार देखील करावा.दोन दिवसांपुर्वी एका कर्मचाऱ्यांने दारू पिऊन धिंगाणा घातला.गेले सात आठ महिने त्याचे वर्तन असेच आहे.त्याकडे कुणी लक्ष का देत नाही.त्यामुळे श्री.रावराणे यांनी या प्रश्नांवर पहिले बोलावे त्यानंतर त्यांनी श्री.नाईक यांच्यावर टिका करावी असे देखील श्री.पावसकर यांनी पत्रकातुन स्पष्ट केले आहे.