युवासेनेने उचललेला आरोग्याचा वसा कौतुकास्पद : अरुण दुधवडकर

कलमठ येथील आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 10, 2023 19:43 PM
views 96  views

कणकवली : कणकवली मतदार संघातील आरोग्य यंत्रणेचा सत्याधारांनी व्हेंटिलेटर वर ठेवली आहे. मतदार संघातील जनतेला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून सुशांत नाईक यांनी आरोग्य सेवेचा उचललेला वसा अत्यंत कौतुकास्पद आहे. आरोग्य चांगले असेल तर माणसाला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो. या दृष्टिकोनातून सुशांत नाईक यांनी बी. के. वालावलकर रुग्णालय डेरवण व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने अशा आरोग्य शिबिरातुन जनतेला निरोगी आरोग्य देण्याचे काम हाती घेतले आहे. युवा सेनेच्या माध्यमातून असेच सेवाभावी उपक्रम हाती घेऊन जनतेची सेवा करावी, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.

बी. के. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण आणि ठाकरे शिवसेना व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी श्री. दुधवडकर बोलत होते. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा प्रमुख नीलम पालव, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपतालुकप्रमुख सचिन आचरेकर, युवासेना जिल्हा समनव्यक राजू राठोड, तेजस राणे, प्रमोद म्हसुरकर, स्वरूपा विखाळे, माधवी दळवी, रामदास विखाळे, महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर, कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री, युवासेना तालुका संघटक नितेश भोगले, विलास गुडेकर, बाळू मेस्त्री, रिमेश चव्हाण, अल्पसंख्य जिल्हा सरचिटणीस निसार शेख, हळवल सरपंच आनंद ठाकूर, ग्रा. पं. सदस्य सचिन खोचरे, प्रियाली आचरेकर, नजराणा शेख, शाखा प्रमुख प्रणय शिर्के, किरण हुण्णरे, सिकंदर मेस्त्री, संदिप कांबळी, आशिष मेस्त्री, संतोष मेस्त्री, नंदकिशोर कोरगांवकर, आशीष कांबळी आदी शिवसैनिक उपस्थित होते. 

संदेश पारकर म्हणाले, जनतेला चांगल्या आरोग्य यंत्रणेची गरज असतानाही महाराष्ट्र शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने आक्रमक होऊन कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेबाबत अनेक आंदोलने केली तरीही शासनाला जाग आली नाही. आपण जनतेचे देणे लागतो ही कर्तुत्वाची भावना मनात ठेवून शिवसेनेचे समाजसेवेचे काम सुशांत नाईक यशस्वीरित्या युवासेनेच्या माध्यमातून करत आहेत. आतापर्यंत युवासेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युवासेनेने गेल्या काही दिवसात दोन आरोग्य शिबिरे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. या शिबिरांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  जनतेला आरोग्य यंत्रणेची किती गरज आहे हे या शिबिरामधून दिसून आले. 

सुशांत नाईक म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सातत्याने आंदोलने छेडली. याचाच एक भाग म्हणून युवासेनेच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघात ६ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कलमठ येथे झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, असे श्री. नाईक यांनी सांगितले.

या आरोग्य शिबिरात २१० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी झाली असून यामधील २२ जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे तर १३ जणांवर आदी आरोग्य विषयक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरात सर्जन, अस्थिरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, जनरल मेडिसिन, नाक, कान, घसा तज्ज्ञांचा समावेश होता.