सिंधुदुर्गच्या राजाचं भव्य मिरवणूकीनं आगमन..!

Edited by:
Published on: September 17, 2023 18:09 PM
views 118  views

कुडाळ : कुडाळ येथे विराजमान होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाच्या आगमनाची मिरवणूक बजाज शोरूम ते भाजप कार्यालय पर्यंत काढण्यात आली आहे.सिंधुदुर्ग राजाच यंदाचे हे 14 वे वर्ष आहे. लालबागच्या राजाप्रमाणे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना गेली 14 वर्षे केली जात आहे. या ही वर्षी रविवारी डीजेच्या तालावर गणरायाची मिरवणूक काढण्यात आली असून मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिवशी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थित विधिवत पूजा करत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

या आगमन मिरवणुकीला यावेळी भाजपचे उपाध्यक्ष रणजित देसाई जिल्हा सरचिटणीस विनायक राणे,तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, आनंद शिरवलकर, नगरसेवक विलास कुडाळकर, निलेश तेंडुलकर, राजू राऊळ,संदेश नाईक, चंदन कांबळे, प्रसन्ना गंगावणे, राकेश नेमळेकर, स्वरूप वाळके, आधी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.