GOOD NEWS ; मान्सूनचे केरळमध्ये आगमन

Edited by: ब्युरो
Published on: June 08, 2023 15:39 PM
views 449  views

केरळ : हुश्श.. एकदाची प्रतीक्षा संपली मान्सून केरळात आल्याचे वृत्त हवामान विभागाने दुपारी 1 वाजता जाहीर केले अन् आनंदाची लहर देशात निर्माण झाली. 1 जूनला येणारा मान्सून 7 दिवस उशिरा आला आहे. आता महाराष्ट्रात येण्यास किमान सात दिवस लागतील. 12 ते 15 जूनच्या दरम्यान तो राज्यात येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बिपोर जॉय चक्रीवादळाची निर्मिती होताच लक्षद्वीपमध्ये अडखलेल्या मान्सूनला गती मिळाली, आणि 9 रोजी येणारा मान्सून 24 तास आधीच सर्वांचे अंदाज चुकवत 8 जून रोजी दुपारी 12.30 वाजता केरळमध्ये दाखल झाला.

चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास जोरदार सुरू आसून तो तळकोकणात 12 जून तर उर्वरित महाराष्ट्रात 15 जून पर्यन्त येण्याची शक्यता आहे.