दहावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातून परुळे हायस्कुलची अर्पिता सामंत प्रथम

तालुक्यातील १७ शाळांचा निकाल १०० टक्के
Edited by: दिपेश परब
Published on: May 27, 2024 14:23 PM
views 441  views

वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.७१ टक्के एवढा लागला. तर तालुक्यात अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळेच्या अर्पिता अमेय सामंत हिने ९९.४० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर स.का पाटील विद्यामंदिर केळुसच्या गायत्री विवेकानंद बागलकर हिने ९८.२० टक्के गुण मिळवत द्वितीय तर वेंगुर्ला हायस्कुलच्या प्रतीक्षा अशोक आरोलकर हिने ९७.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.  वेंगुर्ला तालुक्यातून एकूण ७०७  विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यात एकूण १९ शाळा पैकी १७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. 


तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे: 


◆ दाभोली इंग्लिश स्कुल दाभोली हायस्कुलमधील १६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. 

यात प्रथम कशिश उदय कोनकर ४२३ गुण (८४.६०टक्के), द्वितीय हेतल दिनेश कोंडुरकर ३९७ गुण (७९.४० टक्के), तृतिय राखी मंगेश टेमकर ३९५ गुण (७९ टक्के) 


◆वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला मधील परीक्षेला बसलेल्या १०४ विद्यार्थ्यांपैकी १०३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९९.०३ टक्के निकाल लागला. यात प्रथम प्रतीक्षा अशोक आरोलकर ९७.८० टक्के, द्वितीय दुर्वा संदीप परब ९५.६० टक्के, तृतीय द्राम हनुमंत लाड व यशस्वी दत्तप्रसाद परब ९५.४० टक्के. 


◆ आर.के. पाटकर हायस्कूल मधील सर्व ४१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम विनोद चव्हाण ४६६ गुण (९३.२० टक्के), द्वितीय निखिल हळदणकर ४६५ गुण (९३ टक्के), तृतीय करण कारंगूटकर ४५२ गुण (९०.४० टक्के) 


◆न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा मध्ये सर्व ३६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. प्रथम श्रुती श्रीधर शेडवे ४७२ गुण (९४.४० टक्के), द्वितीय दीपेश जयराम वराडकर ४६३ गुण (९२.६० टक्के), तृतीय योजना रावजी कुर्ले ४४९ गुण (८९.८०टक्के)  


◆ सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल मधील सर्व ४७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम निधी सुहास पालकर ९३.६० टक्के, द्वितीय चिन्मय नारायण पेडणेकर ९१.६० टक्के, तृतीय साक्षी आदित्य प्रभूखानोलकर व मोहन रामचंद्र मालवणकर ९०.४० टक्के


◆ मदर तेरेसा स्कूल मधील सर्व २५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम स्नेहा राजन नार्वेकर ९६ टक्के , द्वितीय जागृती दिनेश तुळसकर ९१.४० टक्के, तृतीय आयुष जगदीश कुमावत ८८.८० टक्के.


◆ न्यू इंग्लिश स्कुल मातोंड हायस्कूल मधील सर्व १३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम रती रामचंद्र हरमलकर ४११ गुण (८२.२० टक्के), द्वितीय तनिष्का कृष्णा गोसावी ३७९ गुण (७५.८० टक्के), तृतीय सहदेव राघोबा सावंत ३६६ गुण (७३.२० टक्के) 


◆अणसूर-पाल हायस्कूल मधील सर्व ३२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन  १००टक्के निकाल लागला. यात प्रथम मंदार बापू नाईक ४७५ गुण (९५ टक्के), द्वितीय यज्ञेश भास्कर गावडे ४६५ गुण (९३ टक्के), तृतीय भूमिका अनंत राऊळ ४४१ गुण (८८.२० टक्के) 


◆ शिवाजी हायस्कूल, तुळस मधील सर्व २४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम हर्षदा बाळकृष्ण होडावडेकर ४६१ गुण (९२.२०टक्के), द्वितीय पुष्कर विजय पेडणेकर ४५४ गुण (९०.८० टक्के), तृतीय वेदिका हरी तांबोस्कर ४३९ गुण (८७.८० टक्के)


◆ श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे मधील सर्व ७४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम कीर्ती विजय कुंभार ४७५ गुण (९५ टक्के), द्वितीय आर्या प्रकाश आरोलकर ४६३ गुण (९२.६० टक्के), तृतीय कानू किशोर धुरी ४६० गुण (९२ टक्के) 


◆ रा. धो. खानोलकर हायस्कूल, मठ मधील सर्व १७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम श्रावणी प्रशांत धुरी ४६९ गुण (९३.८० टक्के), द्वितीय प्राची संतोष दाभोलकर ४५१ गुण (९०.२० टक्के), तृतीय भाविक विनायक आईर ४३९ (८७.८० टक्के) 


◆कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली मधील सर्व २५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम माधवी बाबुराव धर्णे ४१२गुण (८२.४० टक्के), द्वितीय अर्पिता घनश्याम राणे ३७३ गुण (७४.६० टक्के), तृतीय अपूर्वा उदय धर्णे ३६० गुण (७२ टक्के) 


◆ अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा मधील एकूण ८५ पैकी ८४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९८.८० टक्के निकाल लागला. यात प्रथम सलोनी नितीन बागवे ४७६ गुण (९५.८० टक्के), द्वितीय नरेश मंगेश कांबळी ४७१ गुण (९४.८० टक्के), तृतीय अथर्व अभिजित सोनसुरकर ४६६ गुण (९४.२० टक्के)


◆ श्री माऊली विद्यामंदिर, रेडी मधील सर्व १९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रिया गणेश वारखंडकर ४३१ गुण (८६.२० टक्के), द्वितीय भारती अंशिका राजेशकुमार ४२६ गुण (८५.२० टक्के), तृतीय शुभम विष्णू रेडकर ४१६ गुण (८३.२० टक्के)


◆ श्री सरस्वती विद्यामंदिर आरवली टांक मधील सर्व १५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल निकाल लागला.  यात प्रथम राहुल रामचंद्र कावळे ४३६ गुण (८७.२०टक्के), द्वितीय दत्ताराज विनोद टेमकर ४३० गुण (८६ टक्के), तृतीय प्रथमेश प्रदिप नाबर ४०६ (८१.२० टक्के) 


◆आसोली हायस्कूल, आसोली मधील १६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम नमिता भरत गावडे ८८.८० टक्के, द्वितीय आदित्य नारायण पाटील ८० टक्के, तृतीय वैशाली सोमनाथ नाईक ७४.६० टक्के


◆ स. का. पाटील केळुस मधील सर्व ३३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम गायत्री विवेकानंद बागलकर ९८.२० टक्के, द्वितीय सुमती संतोष गोसावी ९१.२० टक्के, तृतीय कौकीक रवींद्र वझरकर ८९.८० टक्के


◆ अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे मधील ४२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम अर्पिता अमेय सामंत ४९७ गुण (९९.४० टक्के), द्वितीय दिशा शंकर परब ४७९ गुण (९५.८०टक्के), तृतीय शाल्मली शंकर घोगळे ४५३ गुण (९०.६० टक्के)


◆मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी मधील सर्व २९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला. यात प्रथम प्रांजली नितीन परब ९०.२० टक्के, द्वितीय शर्वरी गजानन डुबळे व तन्वी आनंद तांडेल ९० टक्के, तृतीय अथर्व दिनेश तोरस्कर ८९.६० टक्के.