आरोंदा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा ६ डिसेंबरला मेळावा

Edited by:
Published on: November 28, 2024 12:45 PM
views 294  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील आरोंदा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यावतीने आरोंदा हायस्कूल येथे शुक्रवार दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. माजी विद्यार्थी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विद्यार्थी सुसंवाद कार्यक्रम व पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या महामेळाव्याचे स्वागताध्यक्ष लेफ्ट. कर्नल पद्माकर नाईक हे आहेत. बालरोगतज्ज्ञ डॉ. बळवंत केरकर हे अध्यक्षपदी असतील. डॉ. अरुण पणदूरकर हे प्रमुख मार्गदर्शक आहेत. शास्त्रज्ञ डॉ. पी. वाय. नाईक, संजीव नाईक, सूर्यकांत पोखरे, प्रा. स्मिता पार्सेकर, श्याम नाईक व संदीप पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल, उपस्थितांसाठी नाश्ता, चहापान व स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे. रात्री ७.३० वा. दशावतारी नाट्यप्रयोग 'विंद्यवासिनी विदेश्वरी' होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमास माजी विद्यार्थी , ग्रामस्थ व हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष संदेश परब, उपाध्यक्ष रघुनाथ नाईक, सचिव वासुदेव देऊलकर, सहसचिव अशोक धर्णे, खजिनदार रुपेश धर्णे, मुख्याध्यापक सिध्दार्थ तांबे आदींनी केले आहे.