नितेश राणेंकडून आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळेला संगणक संच - प्रिंटर

Edited by: गणेश दुखंडे
Published on: August 08, 2023 20:53 PM
views 95  views

देवगड : आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळे या केंद्रातील कर्मचारी यांना आरोग्य विभागाच्या खास ऑनलाईन कामकाजासाठी कुवळेतून शिरगावला जावे लागत असे, त्यामुळे ग्रामपंचायत कुवळे रेंबवलीचे सरपंच  सुभाष कदम, उपसरपंच , प्रदोष प्रभूदेसाई, ग्रा.प सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर,सुहास राणे, प्रणया मालणकर, उर्मिला परब, रोहिणी लाड, सानिका म्हणयारे आणि बूथ प्रमुख अजित घाडी यांच्या पाठपुराव्यामुळे आरोग्यवर्धीनी केंद्र कुवळेला संगणक संच आणि प्रिंटर मा.सरपंच सुभाष कदम यांच्या हस्ते आणि कुवळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संगणक संच आणि प्रिंटर प्रदान करण्यात आला.


यावेळी सरपंच सुभाष कदम यांनी आमदार नितेश राणे साहेबांचे आभार व्यक्त केले तसेच आम्ही नितेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे वक्तव्य केले आरोग्यवर्धिनी केंद्र कुवळे साठी संगणक संच आणि प्रिंटर देऊन आमची समस्या दूर केली त्यामुळे ग्रामपंचायत कूवळेचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे आभारी आहोत आणि आमदार साहेबांचे आम्ही विशेष आभारी आहोत असे वक्तव्य आरोग्यवर्धिनी केंद्र च्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पूजा साळुंखे यांनी वक्तव्य केले.

याप्रसंगी मा. सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, बुथप्रमुख, तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सौ.पावस्कर सिस्टर सौ.तावडे सिस्टर, आशा स्वयंसेविका सौ.रश्मी चिंदरकर,गटप्रवर्तक सौ.फाटक, मदतनीस सौ भावना कदम,ग्रापमपंच्यात संगणक ऑपरेटर वीरेश वळंजू ,भाजपा युवा प्रमुख कुवळे श्री.विनोद कुळेकर तसेच लक्ष्मण बागवे, निलेश घाडी,अनंत घाडी, सखाराम घाडी, रवी घाडी, उल्हास परब, विनायक कदम आणि महिला भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.