पार्किंगचा वाद मारहाणीपर्यंत गेला

Edited by:
Published on: June 28, 2024 04:55 AM
views 241  views

सावंतवाडी : शाळेच्या आवारात गाडी पार्किंगवरून विचारणा केल्याने एकाला रस्ता अडवून मारहाण केल्याचा प्रकार काल गुरुवारी  शहरात घडला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार शहरातली दोन युवकांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या आवारात झालेल्या बाचाबाचीनंतर हा प्रकार घडला. फिर्यादी घडलेल्या प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात माहिती देण्यासाठी येत असताना दोन युवकांनी वाट अडवित धक्काबुक्की केली. यात फिर्यादीच्या डोळ्याला व डाव्या पायाच्या गुडघ्यावर, अंगठ्यावर दुखापत झाली. तर फिर्यादीन गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली आहे अशी तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन्ही युवकांवर वाट अडवून मारहाण करणे तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सावंतवाडी पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांनी दिली.