आरेश्र्वर हायस्कूल आरेला सॅनिटरी पॅड डिस्पोजर मशीन प्रदान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 26, 2023 13:59 PM
views 88  views

देवगड : आरे ग्रामपंचायतीच्यावतीने 26 ऑगस्ट 2023 ला श्री.आरेश्वर हायस्कूल,आरे ला सॅनिटरी पॅड डिसपोजर मशीन देण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले,आपण आपल्या समस्या आपल्या ग्रामपंचायतीकडे मांडा. म्हणजे ग्रामपंचायत आपल्या स्तरावरून उपाययोजना करतील.आपण विद्यार्थी म्हणून मोबाईलचा वापर किती प्रमाणात करावा, यावर काहीतरी बंधन असलं पाहिजे. आपल्या मोबाईलच्या माध्यमातून गुगल सर्च इंजिन वरून तुमच्या अभ्यासासाठी आवश्यक त्या गोष्टी निश्चितच उपलब्ध होतील. पण मनोरंजन म्हणून फेसबुक, व्हाट्सअप, रील बनवणे यामध्ये उगाच वेळ वाया घालवू नका. यापुढे निर्भयाअंतर्गत आपल्या हायस्कूल मधून देवगड पोलीस स्टेशन मध्ये,आपल्या ग्रामपंचायती च्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. यामध्ये मुलींना सतत उद्भवणाऱ्या संकटांवर कशी मात करता येईल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, शेवटी आपण चांगला अभ्यास करून आपल्या गावाचं आपलं नाव मोठ कराव असे अजित कांबळे यांनी प्रतिपादन केले.

यावेळी व्यासपीठावर आरे सरपंच ममता कदम, उपसरपंच रत्नदीप कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य अजित कांबळे,माजी उपसरपंच महेश पाटोळे, मुख्याध्यापक खोचरे , ग्रामसेवक केतन जाधव, आशा स्वयंसेविका प्रेरणा कांबळे, अंगणवाडी सेविका अपेक्षा कोकम ,प्रगती मेस्त्री,मदतनीस दीपा कदम, शिंदे, फाळके, कर्मचारी तळवडेकर, खरात, लोके व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे स्वागत खोचरे यांनी केले तर आभार प्रदर्शन फाळके यांनी केले.