के एल ई एस जी आय टी आर्किटेक्चर विभागाचा रौप्य महोत्सव उत्साहात

Edited by: लुईस रॉड्रिग्ज
Published on: January 18, 2024 13:55 PM
views 164  views

बेळगाव : इन्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधील आर्किटेक्चर विभागातर्फे १२ आणि १३ जानेवारी ला रेझोनन्स' या रौप्य महोत्सवी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रख्यात वास्तुविशारद आणि अबिन डिझाइन स्टुडिओ, इंडियाचे संस्थापक प्राचार्य अबिन चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

    चौधरी यांनी आपल्या भाषणात वास्तू उभारताना भारतीय वारशातील कौशल्ये तसेच शिल्पकलेचा समावेश करण्याच्या महत्त्वावर भर दिला. तसेच आधुनिक वास्तुशा- स्त्रीय ज्ञानासोबतच वडिलोपार्जित कौशल्याचा इमारतींच्या बांधका- मांमध्ये मिलाफ करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच वास्तुविशारद भारतीय वास्तुविशा- रद संस्था (आयआयए), कर्नाटक चॅप्टरचे अध्यक्ष, मोहन बी. आर. यांनी प्रकल्प मॉडेल्सच्या प्रदर्शनावर विचार मांडले. तसेच इमारती बांधण्यात स्थापत्य शास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे, याबाबत माहिती दिली.

कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मांडगी यांनी २५ गौरवशाली वर्षे पूर्ण करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भूतकाळातील आणि वर्तमान शिक्षकांच्या भूमिकेचे आणि सर्व योगदानकर्त्यांचे कौतुक केले. यापुढील काळातही सर्वांनी प्रयत्न सुरू ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

२५ वर्षांच्या वास्तुशास्त्रातील उत्कृष्टतेमागे मार्गदर्शक शक्ती असलेल्या माजी प्राध्यापकांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील, विभागप्रमुख डॉ. रूपाली कविलकर, गव्हर्निंग कौन्सिल (एमएएम), केएलएस जीआयटीचे अध्यक्ष प्रमोद एन. कठवी उपस्थित होते.