अर्चना घारेंची प्रचारात आघाडी

Edited by:
Published on: November 08, 2024 20:05 PM
views 378  views

दोडामार्ग : तालुक्यातील युवक युवतींच्या हाताला काम देण्यासाठी बारामती पॅटर्न वर प्रदूषण विरहित उद्योग हजारो महिलांना एकाच प्लॅटफॉर्मवर काम देणारा टेक्स्टाईल पार्क, आयटी हब, काजू, फणस, आंबा फळावर प्रोसेसिंग युनिट आणून अन्य व्यावसाया बरोबरच शेती व्यवसायत देखील अमुलाग्र बदल घडविण्याचा माझा दृष्टिकोन आहे. वे हाऊस, कोल्ड स्टोरेज यासारख्या व्यावसायातून हजारो युवक, महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल असा रोजगार भिमुख विकसित दोडामार्ग मला घडवायचा आहे. त्यासाठी मला एकदा निवडून देऊन सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार अर्चना घारे यांनी प्रचाराचा दरम्यान केल. 

आज झोळंबे येथुन त्यांच्या झंझावात प्रचाराची सुरुवात दोडामार्ग तालुक्यात झाली. यावेळी बोलत होत्या. अर्चना घारे परब यांच्या समवेत श्री.संदीप गवस , प्रदीप चांदेलकर , ममता नाईक , प्रिया देसाई , सुदेश तुळसकर , उल्हास नाईक , सुभाष लोंढे , गौतम महाले , आनंद तुळसकर , सागर नाईक , रविकिरण गवस , रिद्धी मुंगी , माधुरी वेटे , प्रतीक्षा मुंगी , सुनिता भाईप , मयुरी भाईप , राधिका धुरी , अलीशा गोठसकर आदी सर्व ग्रामस्थ , महिला , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे परब यांना शुभेच्छा दिल्या.

त्या म्हणाल्या, दोडामार्ग तालुका निर्मिती झाल्यापासून विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला आहे. विकासाचे प्रश्न भेडसावत असून प्रत्येक गोष्टीसाठी येथील स्थानिक युवक, युवतींना नागरिकांना गोव्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दोडामार्ग तालुक्याची आरोग्याची परिस्थिती बिकट असून आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्या उद्भवत आहेत. छोट्या छोट्या आजारांवर उपचार घेण्यासाठी येथील नागरिकांना गोवा राज्यात जावे लागते हे दुर्दैव आहे. एमआयडीसी अस्तित्वात असल्यापासून नावालाच आहे. सत्ताधाऱ्यांना दुर्लक्ष करून तिथे एकही प्रकल्प उभारला नसून तालुक्यातील युवकांना नोकरीसाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. रोजगार नसल्याने येथील युवकांच्या डोळ्यात अश्रू शिवाय काहीच दिसत नाही. गोव्यात जाणाऱ्या युवकांवर जीवावर बेतणारे प्रकार घडलेले आहेत. या अशा दुर्घटना मुळे मुलांचे भवितव्य अंधारात असल्याने आई-वडील दुःखी होत आहेत. महिला सुरक्षित, सुखी, समाधानी तसेच कुटुंब सुखी यावर प्रामुख्याने काम करणे ही काळाची गरज आहे. आडाळी एमआयडीसीचा विषय कृती समितीने जनतेसमोर मांडला आहे त्यावरून हे स्पष्ट झालं आहे की लोक फक्त श्रेय घेण्यासाठीच पुढे येतात या अनुभव जनतेने घेतला आहे. 

तालुक्याची शैक्षणिक व्यवस्था पाहता शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. अशा परिस्थितीत  विद्यार्थी जीव टांगणीला लावून शिक्षण घेत आहेत. ज्ञान मंदिरातच मुले सुरक्षित नाहीत ही जोडामार्ग तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था आहे. ही अवस्था बदलणे अत्यंत गरजेचे आहे. तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेकडे केवळ सत्ताधाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे विद्यामंदिरे मोडकळीस आल्या आहेत.  

शेतकऱ्यांचे हाल पाहता येथील शेतकऱ्यांचे मनोबल तुटत असून शेतमाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंता दूर झालेला आहे. रानटी जनावरापासून शेतमालाचे होणारे नुकसान आणि शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. शेती वाचवता वाचता शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणारे प्रसंग अतिशय भयावह आहे. या विषयावर सत्ताधारी एकही शब्द बोलत नसून उपायोजनांकडे दुर्लक्ष करीत आहेत.  तालुक्यातील युवक युवतींच्या हाताला काम देण्यासाठी बारामती पॅटर्न प्रदूषण विरहित उद्योग व्यवसाय टेक्स्टाईल पार्क हजारो महिलांना एकाच प्लॅटफॉर्मवर काम मिळेल असा आहे. आयटी हब आणल्यास पाच हजार युवकांना त्या मार्फत नोकरी मिळू शकते. याच भुमीत पिकणाऱ्या आपल्या काजू, फणस, आंबा या फळ उत्पादनावर प्रोसेसिंग युनिट आणू शकतो,  वे हाऊस, कोल्ड स्टोरेज यासारख्या व्यावसायातून युवकांना, महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. 

दोडामार्ग तालुका हा पूर्णता दुर्लक्षित राहिला असुन यापुढे वेगवेगळ्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. ही आमची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. हे माझे कर्तव्य समजुन तालुक्याच्या या सर्व गोष्टींवर मी प्रामुख्याने लक्ष घालून काम करणार आहे.