अर्चना घारे-परब यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या दिल्या शुभेच्छा

ईदच्या निमित्ताने समाजातील बंधुभाव, आपुलकी, समता वृद्धिंगत होवो हीच सदिच्छा : घारे - परब
Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2023 12:34 PM
views 248  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील कादरी मसजिद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद हा सण सर्वत्र उत्साहात एकोप्यान व उत्साहाने साजरा केला जातो. या ईदच्या निमित्ताने समाजातील बंधुभाव, आपुलकी, समता वृद्धिंगत होवो हीच सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला निरीक्षक दर्शना बाबर-देसाई, महिला शहराध्यक्ष अँड सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, भाईजान आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.