मुलांचे करिअर हाच समाजाच्या उज्वल भविष्याचा पाया : अर्चना घारे

Edited by: विनायक गावस
Published on: December 06, 2023 13:11 PM
views 130  views

सावंतवाडी : मुलांचे करिअर हाच आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या उज्वल भविष्याचा पाया असतो याच भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अर्चना फाउंडेशनच्या वतीने वेंगुर्ला हायस्कुल, वेंगुर्ला येथे करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात डॉ. अजय दरेकर यांनी विद्यार्थ्यांना करियर निवडण्यासाठी येणाऱ्या अडचणी, कोणते क्षेत्र निवडावे ? या सर्व गोष्टींचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र निवडावे असे त्यांनी सांगितले. यावेळी मनोज तिरोडकर यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. 


यावेळी वेंगुर्ला हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, वेंगुर्ला शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय लिंगवत, तुळस अध्यक्ष अवधूत मराठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विवेक गवस, वेंगुर्ला शहर सचिव स्वप्निल राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.