साटेलीत कृष्ण भोजन नाट्य प्रयोग !

अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: December 05, 2023 15:32 PM
views 181  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री देवी माऊली मंदिर साटेली येथे जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ यांच्या "कृष्ण भोजन" या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. साटेली सह परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी या नाट्य प्रयोगास उपस्थित राहून कलाकारांना दाद दिली. 

यावेळी सौ. अर्चना घारे परब यांनी नाट्य प्रयोग सादर करणारे कलाकार व आयोजक विजय साटेलकर व समस्त साटेली ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी जय हनुमान दशावतार नाट्यमंडळाचे शरद मोचेमाडकर, मानकरी नाईक, नंदू साटेलकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.