शरीर तंदुरुस्तीसाठी व्यायाम आवश्यक : अर्चना घारे परब

Edited by: विनायक गांवस
Published on: July 31, 2024 14:35 PM
views 172  views

सावंतवाडी : शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी, आजारांपासून संरक्षण करण्यासाठी नित्यनेमाने व्यायाम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी केले. तळवडेतील गावडे फिटनेस या जीमला आवश्यक वस्तूंची भेट  अर्चना फाउंडेशनद्वारे दिली.यावेळी सौ. घारे बोलत होत्या. 

तळवडे गेट येथील गावडे फिटनेस या जीमला सौ. अर्चना घारे परब यांनी भेट दिली. यावेळी जीमसाठी आवश्यक वस्तू अर्चना फाउंडेशनद्वारे भेट स्वरूपात देण्यात आल्या. यावेळी सौ. घारे म्हणाल्या, सध्याच्या जीवनशैलीत व्यायामाला अधिक महत्त्व आहे. तळवडेतील गावडे फिटनेसमुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना व्यायामासाठी शहरात जाण्याची गरज आता भासणार नाही. गावातच जीम उपलब्ध करून दिल्याबद्दल महेशकुमार गावडे यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा आहेत अशी भावना सौ.‌ घारे यांनी व्यक्त केली. 

याप्रसंगी सुरज नेमण, महेशकुमार गावडे, यश सावंत, हर्ष जाधव, रोहीत गोडकर, विशाल नेमण, परिक्षीत शेट्ये, राष्ट्रवादीचे विधानसभा समन्वयक राजू भगत, तळवडे गाव अध्यक्ष राजन परब, श्रीरंग परब, अक्षय भैरे, विनायक परब, रामदास गवस आदी उपस्थित होते.