अर्चना घारे - प्रवीण भोसले यांनी मिरकर कुटुंबाचं केलं सांत्वन

Edited by: संदीप देसाई
Published on: June 08, 2023 20:12 PM
views 127  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष लवू मिरकर यांच अकाली निधन झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व  विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा महिला नेत्या अर्चना घारे  यांनी मिरकर कुटुंबीयांची गुरवारी निवस्थानी भेट घेत सांत्वन केलं.

यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी सुदेश तुळसकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रवीण भोसले यांनी मिरकर कुटुंबीयांना धीर देत, दोडामार्ग शहराच्या जडण घडणीत लवू मिरकर यांचं मोठ योगदान असल्याचं सांगितल. व मिरकर कुटुंबियांच्या दुःखात राष्ट्रवादी परिवार सहभागी असल्याचं सांगत सात्वन केलं.