
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी मळेवाड येथील राणी पार्वतीदेवी विद्यालय केंद्रशाळा भेट दिली. येथील शालेय पोषण आहार योजनेची माहिती घेतली. याप्रसंगी शाळेत मुलांना मिळणारा पोषण आहार योग्य दर्जाचा आहे की नाही ? याबाबत पाहणी केली.
मुलांचा पोषण आहार उत्तमच असायला हवा. त्यांच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न आहे. आपल्या देशाचे भवितव्य ज्यांच्या हातात आहे ती पिढी सुदृढ व्हावी यासाठी जागरूक राहायलाच हवे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केल. यावेळी अर्चना घारे विद्यार्थ्यांत रमताना देखील पहायला मिळाल्या. मुलांसोबत पंगतीत बसत त्यांनी पोषण आहार केला.