श्री देवी शेंडोबा माऊलीच्या जत्रोत्सवानिमित्त अर्चना घारेंनी घेतलं दर्शन

Edited by: विनायक गावस
Published on: December 06, 2023 13:08 PM
views 130  views

सावंतवाडी : देवसू येथील श्री देवी शेंडोबा माऊलीच्या वार्षिक महोत्सवात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात साजरा झाला. कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी या जल्लोषात सहभागी होत मातेच दर्शन घेतले. सर्वांच्या सुख समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली. 

यात्रेचे मानकरी हनुमंत सावंत, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, दिनेश गावडे,  विठ्ठल सावंत, गोविंद सावंत, सुमित सावंत, समीर शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी घारे यांनी श्री देवी शेंडोबा माऊलीचे दर्शन घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या.