कलावंतांना न्याय देण्यासाठी कटीबध्द : अर्चना घारे-परब

Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2024 17:38 PM
views 113  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख असणारे दशावतार तसेच भजनी कलावंत यांची कमिटी बरखास्त केली गेली आहे. यामुळे कलाकारांना मिळणार मानधनापासून, नोंदणीपासून वंचित राहावे लागते आहे. राज्यात आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या तिन महिन्यात पहिल्यांदा ही कमिटी पुन्हा सुरू करणार असल्याची ग्वाही अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी दिली. मतदारसंघातील कलावंतांना भेटीदरम्यान तसा विश्वास सौ. घारे यांनी दिला आहे.


अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी सावंतवाडी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघरी जाऊन त्या आपला अजेंडा मांडत आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजन मंडळी, लोककलावंत दशावतार यांच्याशी यादरम्यान त्यांनी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याची बरखास्त झालेली कमिटी आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या तिन महिन्यात पुन्हा कार्यान्वित करणार आहे. त्यांचे मानधन, त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असल्याचे आश्वासन सौ.‌अर्चना घारे-परब यांनी दिले आहे. मतदारसंघातील भजन मंडळी, दशावतार कलावंतांशी चर्चेदरम्यान त्यांनी हे आश्वासन दिले आहे. तुमचे प्रश्न निकाली काढण्यासाठी मी कटीबध्द आहे असा विश्वास सौ. घारे यांनी दिला.