दोडामार्गात पहिला आलेल्या अथर्वचा राष्ट्रवादीकडून सन्मान

सुरेश दळवी व अर्चना घारे यांनी केलं विशेष अभिनंदन
Edited by: संदीप देसाई
Published on: June 04, 2023 21:08 PM
views 185  views

दोडामार्ग : ९५ टक्के गुण मिळवून दोडामार्ग तालुक्यात पहिला क्रमांक पटकाविलेल्या अथर्व संदीप गवस याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी व अर्चना घारे परब यांनी विशेष सन्मान केला. 

 अथर्व हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. संदीप गवस यांचा मुलगा असून त्याने दहावीत मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल अर्चना घारे परब व सुरेश दळवी यांनी गवस कुटुंबीयांना विशेष सन्मान केला. अथर्वला ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यासाठी आम्ही सहकार्य करू अशी ग्वाही या निमित्ताने अर्चना घारे परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देत अथर्वला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.