
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अर्चना घारे-परब यांची कोकण विभाग महिला अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांनी ही नियुक्ती केली आहे.
सौ. घारे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीने कोकण विभागातून पक्ष नेतृत्वाची संधी दिली आहे. गेली अनेक वर्षे त्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कार्यरत आहेत. अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली आहेत. तळकोकणात राष्ट्रवादी पुन्हा जीवंत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. या निवडीसाठी राष्ट्रवादीकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.