शिरशिंगेत अर्चना घारे - परबांकडून कलामंचाचे उद्घाटन

Edited by: विनायक गावस
Published on: January 09, 2024 14:07 PM
views 101  views

सावंतवाडी : शिरशिंगे गावातील राणेवाडी येथे विघ्नहर्ता कला क्रीडा मंडळ यांच्या पुढाकाराने श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंच बांधण्यात आले. या कलामंचाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना अर्चना घारे यांनी शिरशिंगे गावाची ओळख ही सैनिकांचे गाव आहे असे सांगितले. या गावात अनेक सैनिक देशसेवा करून आपल्या देशाच्या प्रति आपली देशसेवा करत आहेत. अशा या गावात आले की प्रचंड ऊर्जा आणि काम करण्यासाठी धैर्य मिळते. श्री देव क्षेत्रपाल पिंपळेश्वर कलामंचच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या गावात आल्याचा मला आनंद आहे असं मत व्यक्त केले. यावेळी कोकणातील दशावतारी नाटकाचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले होते. यावेळी अर्चना घारे यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच विघ्नहर्ता कला क्रीडा मंडळाच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. या कार्यक्रमास  गणपत राणे, ज्ञानेश्वर राणे गावचे सरपंच मा.राऊळ तसेच अनेक माजी सैनिक, विघ्नहर्ता कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुशांत राणे आणि मित्रपरिवार उपस्थित होते.