
सावंतवाडी : अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी या नुकसानीची पहाणी केली.
त्या म्हणाल्या, प्रामुख्याने झाडे पडून तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. काही ठिकाणी जनावरांच्या शेडचे नुकसान झाले आहे. यातील काही परिसरांमध्ये जाऊन नुकसानीचा आढावा घेतला व तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेत तातडीने पंचनामे करण्याचे विनंती केली आहे. या नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी या पुढील काळात शासन दरबारी पाठपुरावा करावा करणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अँड सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, बावतिस फर्नांडिस, श्री. तेंडोलकर, गौरी गावडे आदी उपस्थित होते.