
सावंतवाडी : आता वाट बघत नसून निर्णय करायचा आहे. आमची शिवसेना, कॉग्रेससह बैठक होईल त्यानंतर उमेदवारी निश्चित होईल. कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे चांगलं काम करत आहेत. त्यांच्याविषयी जनतेत आपूलकी व जिव्हाळा आहे. त्यामुळे यावेळी मतदारसंघात निश्चित बदल घडेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तर रेल्वे टर्मिनस, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवरून स्थानिक आमदार दीपक केसरकरांना चिमटा काढला. मतदारसंघात काय सुधारणा झाल्या ? असा प्रश्न मी विचारला तर स्थानिक नेतृत्वाला राग येऊ नये असा टोला हाणला.
जयंत पाटील म्हणाले, आता वाट बघत नसून निर्णय करायचा आहे. आमची शिवसेना, कॉग्रेससह बैठक होईल, मी आत्ता उमेदवारी जाहीर करत नाही आहे. पण, अर्चना घारे चांगलं काम करत आहेत. त्यांना भविष्यात चांगली संधी मिळेल. महाविकास आघाडीकडून ही जागा आम्हाला सुटेल यासाठी प्रयत्न करू. अर्चना घारे यांच काम चांगलं आहे. त्यांच्याविषयी आपूलकी आहे, जिव्हाळा आहे. त्यामुळे यावेळी मतदारसंघात बदल घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच रेल्वे टर्मिनस, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रश्नावरून त्यांनी स्थानिक आमदार दीपक केसरकरांवर हल्लाबोल केला. सावंतवाडीला रेल्वे स्थानक असून जनतेच्या मनात आहे तसं काम होत नाही. केवळ बाहेरील परिस्थिती बदलली. आतली परिस्थिती तशीच आहे. एलइडीचा प्रश्न मी सभागृहात उपस्थित केला होता. मात्र, मच्छिमारांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारनं काहीही केलं नाही. इथलं मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल झालं नाही. त्यामुळे लोक गोव्यात जाऊन उपचार घेतात. या मतदारसंघात काय सुधारणा झाल्या ? असा प्रश्न मी विचारला तर स्थानिक नेतृत्वाला राग येऊ नये असा चिमटा त्यांनी मंत्री केसरकरा यांना काढला. यावेळी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवक अध्यक्ष मेहबूब शेख आदी उपस्थित होते.