मंडणगड आगाराचा मनमानी कारभार ; प्रवाशांचा संताप

Edited by: ब्युरो
Published on: November 05, 2022 16:33 PM
views 213  views

मंडणगड : मंडणगड एसटी बस आगारातून सोडण्यात येणाऱ्या एसटीबस अधिकाधिक नादुरुस्त असतात तर त्या कधीच वेळेवर सोडल्या जात नाहीत. याबाबत चौकशी केली तर अधिकाऱ्यांकडून उद्दट उत्तरे दिली जातात. यामुळे प्रवासीवर्ग त्रस्त आहेत. 

मंडणगड तालुका हा तसा दुर्लक्षित म्हणूनच परिचित असल्याने या तालुक्यातील एसटी डेपोतून सोडण्यात येणाऱ्या जवळच्या व लांबपल्याच्या बस फेऱ्या ह्या वेळेत सोडल्या जात नाही तर ज्या सोडल्या जातात त्या अर्ध्यावर बिघडल्या मुळे बंद पडतात या वेळी बस मध्ये टॉमी,टूल बॉक्स,ज्यॅक, प्राथमिक साहित्य देखील बस मध्ये साधे हे देखील  उपलब्ध नसते या साठी वाहक,चालक यांना दुसरी बस येण्याची वाट पहावी लागते या मुळे प्रवासी व शालेय विदयार्थ्यांना  जि.प शाळा,महाविद्यालय मध्ये जाण्यासाठी उशीर होतो तर काही वेळा जि.प शाळा, कॉलेज बुडवावे लागते तर प्रवाशांना वेळेत घरी पोचता येत नाही.

लांब पल्याच्या बस मुंबई,पुणे,रत्नागिरी, कोल्हापूर,नालासोपारा,बोरीवली,अंबाजोगाई,बीड,उस्मानाबाद अशा अनेक बस ह्या देखील वेळेत न सोडल्याने प्रवासी वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या बाबत आगार प्रमुख यांच्याकडे अनेकवेळा लेखी व तोंडी तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांनी याबाबत होणाऱ्या त्रासाबद्दल विभाग नियंत्रक,विभागीय वाहतूक अधिकारी रत्नागिरी यांच्या कडे लेखी तक्रार करून देखील मंडणगड एसटी आगारात कोणतीच सुधारणा होत नसल्याने मंडणगड तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या मंडणगड एसटी आगारातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे ह्या डेपोला भारमान मिळत नाही. 

प्रवाशाना नाईलाजास्तव खाजगी वाहनांचा अवलंब स्विकारावा लागत असल्याने खाजगी वाहतुक व एसटी अधिकारी यांचे काही आर्थिक साटेलोटे तर नाही ना ? अशी शंका प्रवासी वर्गात निर्माण होत आहे.  या सर्व होणाऱ्या मंडणगड डेपोच्या गलथान कारभारामुळे प्रवासी आता लवकरच उपोषणाला बसण्याच्या विचारात आहेत या सर्व प्रकरणाला जातीने लक्ष घालून प्रादेशिक महाव्यवस्थापक मुंबई,विभागीय नियंत्रक रत्नागिरी आळा बसावा एवढीच प्रवासी वर्गाला आशा उरली आहेत.