
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉक्टर जोशी यांच्या मनमानी कारभार करत आहेत.त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनाही त्याचा त्रास होत आहे.यामुळे यांच्याकडील हा पदभार काडून दुसऱ्या कडे द्यावा असे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ यांच्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी केली आहे.
काका कुडाळकर यांनी मंत्री श्री मुश्रीफ यांना दिलेल्या पत्रासोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातिल कर्मचाऱ्यांचे निवेदन जोडले असून,या पत्रात असे नमूद केले आहे की,सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर जोशी हे अत्यंत मनमानीप्रमाणे कारभार करत असल्याचे निदर्शनास येते. त्यांच्या या वागणुकीमुळे अगोदरच अपुरा असलेला कर्मचारी वर्ग त्रासलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे डॉक्टर जोशी यांचा बाह्य रुग्ण विभाग व पेशंटच्या दैनंदिन तपासणी कामगिरी बाबत सतत तक्रारी येत असतात.
त्यामुळे विनंती आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठता पदाचा डॉक्टर जोशींकडे असलेला कार्यभार काढून घेऊन, त्याच ठिकाणी असलेल्या अन्य सेवा जेष्ठ डॉक्टरांकडे लवकरात लवकर प्रभारी अधिष्ठता पदाचा कारभार सोपविण्यात यावा. तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या काळात याचा विपरीत परिणाम महायुतीच्या उमेदवारांना होऊ नये याकरिता लवकरात लवकर निर्णय घ्यावा असेही नमूद केले आहे.
दरम्यान या सर्व प्रकरणी काका कुडाळकर यांनी या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जोशी यांच्याशी चर्चाही केली.मात्र त्यांची कोणतीही कृती योग्य नाही.असे श्री कुडाळकर यांनी सांगितले.