
वेंगुर्ले : छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि संघर्ष जीवनाचा धगधगता इतिहास उलगडून सांगणारा छावा हा चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजां प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांचाही खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार) निमित्त शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट मारुती मंदिर टांक येथे सोमवार दिनांक १७ मार्च २०२५ रोजी, रात्री ठीक ९ वाजता सर्वांना विनामूल्य दाखवण्यात येणार आहे. सर्व शिवभक्तांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षात्कार घ्यावा असे आवाहन शिवप्रेमी मित्र मंडळ आरवली टांक यांनी केले आहे.