
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील गोवेरी गावातील अत्यंत महत्त्वाच्या अशा भगतवाडी येथील साकव (पूल) बांधकामासाठी जिल्हा परिषद वार्षिक विकास योजनेतून तब्बल ₹३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या साकवाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून, गोवेरीच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
आ. निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न !
गोवेरी भगतवाडीतील हा साकव स्थानिक नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक होता. या कामासाठी निधी मंजूर व्हावा म्हणून कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच जिल्हा परिषद वार्षिक विकास योजनेतून ही भरीव रक्कम मंजूर झाली आहे. आमदार राणे यांच्या या कामगिरीबद्दल स्थानिक नागरिक त्यांचे आभार मानत आहेत.
या साकवाच्या मंजुरीमुळे गोवेरी भगतवाडीतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. साकवाअभावी पावसाळ्यात किंवा इतर वेळी होणारी गैरसोय आता दूर होणार आहे.
दळणवळण अधिक सुरक्षित व सोपे होईल. शेतमाल वाहतुकीची समस्या संपुष्टात येईल. विद्यार्थी व पालकांसाठी शाळेत ये-जा करणे अधिक सोपे व सुरक्षित होईल. नागरिकांच्या दैनंदिन हालचाली आता अधिक सुलभ होणार आहेत.
गोवेरी भगतवाडी येथील या साकव बांधकामामुळे गावातील पायाभूत सुविधा मजबूत होणार असून, स्थानिक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.










