
सावंतवाडी : सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरात पोलीस प्रशासनाचे काम उत्कृष्ट आहे. गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये ट्राफिक पोलीस कर्मचारी सुनील नाईक व मयूर सावंत यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याकारणाने सामाजिक बांधिलकी कडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मनुष्यबळ कमी असल्याने ताण असताना देखील चांगले कर्तव्य बजावल्याबद्दल पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले.
गणेश उत्सवाच्या कालावधी मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांनी ऊन - पावसाची तमा न बाळगता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून बाजारपेठ व रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडीची सोडवण्याचे मोठे काम केले होते.आज सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या 19 व्या दिवशी गणपतीचे विसर्जन होत असल्याचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीचे उपाध्यक्ष प्रा.शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील,रवी जाधव, हेलन निबरे ,सुजय सावंत, शामराव हळदणकर यांनी गणपती दर्शन घेऊन गणेशोत्सवात यशस्वीरीत्या कर्तव्य पार पडणाऱ्या पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व ट्राफिक पोलिस सुनील नाईक व मयूर सावंत यांचे अभिनंदन केले.सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यास पोलीस प्रशासनाच सहकार्य नेहमीच असते.सामाजिक बांधिलकीचे पोलीस प्रशासनाला सुद्धा नेहमीच सहकार्य मिळत असल्याकारणाने पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार गवस, ट्राफिक पोलीस सुनील नाईक व मयूर सावंत व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.