विजेत्या खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी कौतुक सोहळा महत्त्वाचा : वृक्षाली यादव

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 05, 2024 10:01 AM
views 149  views

देवगड : विजेत्या खेळाडुंना व विजेत्या संघाना प्रोत्साहन देण्यासाठीच हा कौतुक सोहळा महत्वाचा असुन विजेता होण्यापेक्षाही क्रिडा स्पधेत सहभागी होऊन सांघिक खेळ महत्वाचा असुन , चॅम्पियन होण्यासाठी देवगडला आलेले अपयश पुढील काळात चॅम्पियन होण्याची नांदी असल्याचे मत  गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी व्यक्त केल. जिल्हा परिषद सिंधुदूर्ग आयोजित क्रिडा स्पधेत देवगड तालुक्याने दमदार कामगिरी करत सर्वांची वाहव्वा मिळवली होती अशा या  सांघिक व वैयक्तीक खेळामध्ये विजेते प्राप्त खेळाडू व  विजेत्या संघासाठी कौतुक सोहळा सांस्कृतिक भवन सभागृहात गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने ,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , विस्तार अधिकारी निलेश जगताप, अधिक्षक मेधा राणे, विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु, आनंद जाधव सर, सचिन जाधव सर, मधुसुदन घोडे सर, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने यांनी देवगड टिमला शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले तसेच ग्रामसेवक संगिता राणे व शिक्षक गुंडू निऊंगरे या खेळाडूंनी मनोगत व्यक्त करत कौतुक सोहळ्याचे आयोजन करून प्रोत्साहन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सांघिक स्पधेत देवगड तालुका क्रिक्रेट पुरुष गटात उप विजेता ठरला होता तर कबड्डी , लंगडी , रस्सीखेच पुरुष गटात उपविजेता ठरला  होता. तर महिला गटात क्रिकेट संघ उप विजेता ठरला होता . या  विजयी संघाना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

तसेच  वैयक्तिक स्पधेत दिव्यांग मधुन बुद्धीबळ स्पधेत कुंदा बोंडाळे प्रथम क्रमांक , कॅरम सिंगल द्वितीय क्रमांक कुंदा बोंडाळे , भाला फेक ,गोळा फेक व थाळी फेक प्रथम क्रमांक अश्विनी सावंत , पुरुष गटात थाळी फेक प्रथम क्रमांक प्रमोद कामतेकर तर गोळा फेक तृतीय क्रमांक विनायक धुरी तर थाळी फेक द्वितीय क्रमांक विनायक धुरी तसेच १०० मिटर धावणे पुरुष गटात प्रथम क्रमांक सुनिल कोदले  ८०० मिटर धावणे पुरुष गटात गुंडू निऊंगरे थाळी फेक पुरुष प्रथम क्रमांक आदित्य कदम, भालाफेक पुरुष तृतीय क्रमांक शितल देवरकर व २०० मीटर धावणे महिला प्रथम क्रमांक आर्या धुरी व  ४०० मीटर धावणे महिला गटात तृतीय क्रमांक सीमा आंधळे . उंच उडी महिला तृतीय क्रमांक शितल दुदवडकर ,थाळी फेक महिला प्रथम क्रमांक कोमल राऊत तर गोळा फेक महिला तृतीय क्रमांक कृपाली घाडी  तर भाला फेक महिला द्वितीय क्रमांक शितल मयेकर या  खेळाडुंना मान्यवरांचे हस्ते गौरवण्यात आले . तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात पंचायत समिती देवगड टीम तसेच फणसगाव शिक्षक विभाग टीम व कक्ष अधिकारी संतोष बिर्जे व वरीष्ठ सहाय्यक स्वप्नजा बिर्जे यांचा दादा कोंडके गाण्यावर अप्रतिम डान्स केल्याबद्दल त्यांचे गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच जिल्हा परीषद क्रिडा स्पधेत प्रत्येक संघातील संघनायकांनी महत्वाची भुमिका बजावली होती . यामध्ये पुरूष गटात क्रिकेट संघनायक सुनिल कोदले , खो खो लहु दहीफळे , कबड्डी आनंद जाधव , रस्सीखेच आदीत्य कदम , लंगडी मधुसूदन घोडे यांनी काम पाहिल . तर महिला गटात महिला क्रिकेट  संघनायक कोमल राऊत , रस्सीखेच संगिता भुजबळ , कबड्डी स्वप्नजा बिर्जे , खोखो मेधा राणे , लंगडी शितल मयेकर यां सर्व कर्णधारांच कौतुकही करण्यात आल . जिल्हासरावरील क्रिडा स्पधेच उत्तम प्रकारे व्यवस्थापन केल्याबद्दल सचिन जाधव सर व आनंद जाधव सरांच सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. या कौतुक सोहळा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद जाधव सर, प्रस्तावना सचिन जाधव सर, तर आभार कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी मानले .