सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2025 18:27 PM
views 14  views

सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ एस् . एस् . सी परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या सर्व  विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १००% निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली.

यामध्ये प्रथम जीया बशीर शेख ( ९७.८० % ), द्वितीय खुशी संतोष गवस (९५ . ८०% ) तृतीय इनान आलीम बंगलेकर व  संजना सुरेशकुमार सुंदेशा ( ९०.४० % ) तर दानिया बिलाल बंगलेकर( ८९ .८० %) गुण मिळवून चौथा आणि प्रतिक्षा सुभाष गावडे (८९ . ६० % ) गुण मिळवून पाचवी आली. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा मंगळवार २७ -०५ - २०२४  रोजी प्रशालेत संपन्न झाला. या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य भरत गावडे, सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष इम्तियाज खानापूरी, उपाध्यक्षा निलोफर बेग, सहसचिव सुलेमान बेग, विश्वस्थ समीर बागवान व मुश्ताक बागवान, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, केजी विभागाच्या इन्चार्ज फरीदा बागवान, पालक प्रतिनिधी निकिता साटेलकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रशालेच्या मुख्याधापिका निर्मला हेशागोळ यांनी पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .  

सहाय्यक शिक्षिका निलम सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या निकालाचे वाचन केले. सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रक व पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी जीया शेख, खुशी गवस, इनान बंगलेकर व संजना सुंदेशा यांना पुष्पगुच्छ व धनादेश देऊन प्रशालेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून जीया शेख, खुशी गवस, दानिया बंगलेकर, इनान बंगरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांनी आपल्या मनोगतातून प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक शिक्षिका स्मृती गवस यांनी पालक व शिक्षक या दोन्ही भूमिकेतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे सहसचिव सुलेमान बेग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षिका यांचे कौतुक करत  विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विदयार्थ्यांनी निर्णयक्षम बना व संयम बाळगा, असे मौलिक विचार संस्थेच्या उपाध्यक्षा निलोफर बेग यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर आपले छंद जोपासावे. तसेच आपले व्यक्तिमत्व व संस्कार जपावे, असे बहुमोल मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भरत गावडे सरांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षिका श्रुती गोडकर यांनी आभार व्यक्त केले.  उपस्थित सर्वांनीच प्रशालेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.