भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

कुडाळ मालवण मतदारसंघासाठी निलेश राणे यांची निवड
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 08, 2023 19:25 PM
views 160  views

मालवण : महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. 

सर्व विधानसभा निवडणूक प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

नव्या नियुक्तीपत्रकानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण मतदार संघाचे प्रमुख म्हणून माजी खासदार निलेश राणे यांची नियुक्ती जाहीर झाली आहे आहे. कणकवली मतदारसंघासाठी मनोज रावराणे तर सावंतवाडी मतदारसंघात विद्यमान जिल्ह्याध्यक्ष राजन तेली यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.