बाळासाहेबांच्या शिवसेनेत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

जिल्हाप्रमुखपदी अशोक दळवी, शहरप्रमुखपदी बाबु कुडतरकर ! शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी केल अभिनंदन
Edited by: विनायक गांवस
Published on: December 05, 2022 16:01 PM
views 310  views

सावंतवाडी : बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पक्षाचे राष्ट्रीय पक्ष प्रवक्ते, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पक्षाचे पक्ष सचिव संजय मोरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून अशोक दळवी यांची नियुक्ती करण्यात आली. महीला जिल्हा संघटक पदी अँड निता सावंत कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कार्यकारणीमध्ये नियुक्ती करण्यात आली असून सावंतवाडी तालुकाप्रमुख पदी नारायण ऊर्फ बबन राणे, दोडामार्ग तालुकाप्रमुख पदी गणेशप्रसाद गवस, वेंगुर्ला तालुकाप्रमुख पदी नितिन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कार्यकारीणीत उपजिल्हाप्रमुख म्हणून सुनिल मोरजकर, वेंगुर्ला, जिल्हा संघटक पदी सुनिल डुबळे, वेंगुर्ला, उपजिल्हा संघटक पदी सचिन देसाई, वेंगुर्ला, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रेमानंद देसाई, दोडामार्ग, उपजिल्हा प्रमुख पदी तुकाराम बर्डे, दोडामार्ग, उपजिल्हाप्रमुख पदी राजेंद्र निबाळकर, दोडामार्ग, उपजिल्हा संघटक पदी दयानंद धाऊसकर दोडामार्ग, तालुका संघटक पदी गोपाळ गवस दोडामार्ग, तालुका संघटक पदी राघोजी सावंत, सावंतवाडी, शहरप्रमुख पदी खेमराज ऊर्फ बाबु कुडतरकर सावंतवाडी, शहरप्रमुख पदी सचिन वालावलकर वेंगुर्ला, शहरप्रमुख पदी लवू मिरकर, दोडामार्ग, उपशहरप्रमुख सुजित कोरगांवकर, सावंतवाडी, उपशहरप्रमुख पदी डॉ. रावजी परब, वेंगुर्ला, उमेश येरम, वेंगुर्ला, महिला तालुका संघटक पदी सौ. वैष्णवी केसरकर, सावंतवाडी, महिला तालुका संघटक पदी सौ. संजना सावंत, सावंतवाडी, महिला शहर संघटक पदी सौ. भारती मोरे, महिला तालुका संघटक पदी सौ. प्रतिक्षा पाटकर, वेंगुर्ला, महिला तालुका संघटक सौ. सानवी गवस, दोडामार्ग याची नियुक्ती करण्यात आली. सर्व पदाधिका-यांचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर, माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.


जिल्हा प्रमुख नियुक्ती नंतर अशोक दळवी यांनी आपले विचार मांडताना व्यक्ती पेक्षा पक्षाला पदाचा मान महत्वाचा आहे. तो शिरस्थानी मानून पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना कसा बहुमान मिळेल याचीही दक्षता घेतली जाईल. ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत जावून शेतकरी, शेतमजूर, गरीब दुबळया व्यक्तीपर्यंत शासनाच्या मुलभुत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने व त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने पक्षाचा जिल्हाप्रमुख म्हणून पदाचा उपयोग करुन योग्य न्याय दिला जाईल हे सर्व काम करीत असताना सर्व पदाधिका-यांना बरोबर घेऊन पक्ष संघटना व लोकाभिमुख काम करण्यासाठी आम्ही कटीबदध रहाणार आहोत.

"गांव तिथे बाळासाहेबांची शिवसेना" सर्वागिण विकासासाठी संकल्प करुन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.