
दोडामार्ग : माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व इतर शैक्षणिक संघटनांनी पुकारलेल्या ०६ ऑगस्टच्या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव गजानन नानचे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने मंगळवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने, तसेच न्याय्य मागण्याबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे धडक मोर्चा आयोजित केलेला आहे. आमच्या शिक्षकेतर संघटनेने सदर आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन सक्रिय सहभागी होणार असल्याचे कळविले आहे. तरी तालुका अध्यक्ष/ सचिव, जिल्हा कार्यकारणी सदस्य व जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी दिनांक ०६/ ८/ २०२४ रोजी सकाळी ११ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे वेळीच उपस्थित राहावे.
तेथून मोर्चा मान. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी कार्यालयावर निघेल सदर मोर्च्यात मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल राणे कार्याध्यक्ष प्रदीप सावंत सचिव गजानन नानचे यांनी केले आहे.