नवमतदारांना नाव-नोंदणी करण्याचे आवाहन

Edited by: देवयानी वरसकर
Published on: October 27, 2023 19:14 PM
views 487  views

सिंधुदुर्गनगरी : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याणने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा. निवडणूका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याकसाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्वपुर्ण असते. यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जातो. दि.२७ ऑक्टोयबर, २०२३ रोजी मा.मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यात संकेतस्थनळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्तत पुनरिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यायत आला, सदर कार्यक्रम २७ ऑक्टोाबर ते ०९ डिसेंबर, २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे. या कालावधीत आक्षेप किंवा हरकती घेता येणार आहेत.

प्रारूप मतदार यादीमध्येक आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प‍ प्रमाणात नोंद असल्यालने त्यां च्याहसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्या त आले आहे. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी विशेष शिबिरे आयोजित केलेली आहेत.दिव्यांंगासाठी कार्य करणा-या सामाजिक संस्थांमच्याव मदतीने दिव्यांलग व्य.क्तीेची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्यात जाणार आहेत. 

ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने दि.२७.१०.२०२३ ते दि.१०.११.२०२३ या कालावधीत जिल्हंयात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात विशेष ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्यात स्त्रीया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्त्व्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती , गावातून कायमस्वंरूपी स्थरलांतरीत झालेल्‍या व्यक्ती, लग्न होऊन अन्या गावात गेलेल्या‍ स्त्री या यांच्यास नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

दिनांक ०५ जानेवारी, २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ६,७२,७७६  इतकी होती. निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आज रोजी एकूण मतदार संख्यार ६,६९,५९८ इतकी असून त्याीमध्येी पुरुष मतदार ३,३३,९८७ व स्त्री  मतदार ३,३५,६११ व स्त्री-पुरुष गुणोत्तार प्रमाण १००५ इतका आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयाच्या लोकसंख्येसत १८-१९ वयोगटाची टक्केवारी ३.४४ इतकी आहे. पण ऑक्टोबरच्या‍ मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी १.०५ एवढी आहे.भारत हा तरूणांचा देश आहे असं आपण एकीकडे म्ह्णतो, पण मतदार यादीतली त्यांची आकडेवारी निराशाजनक आहे. त्यामुळे युवा मतदारांची नोंदणी वाढवण्यादसाठी महाविद्यालयांमध्येे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यांत येणार आहे.