टपाली मतदान सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

Edited by: देवयानी वरसकर
Published on: March 28, 2024 13:55 PM
views 55  views

सिंधुदुर्गनगरी : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना, 40 टक्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना, कोविंड रुग्ण मतदार आणि निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार यांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या सुविधेचा लाभ घेण्याकरिता संबंधीत मतदाराना आवश्यक असलेल्या 12 डी नमुन्याचे वाटप सुरु झाले असून सदर नमुना परिपुर्ण भरुन निवडणूकीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यानंतर 5 दिवसाच्या आत संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत मतदार व निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदारांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या 12/12 ए नमुन्यातील फॉर्म भरुन विहीत कालावधीमध्ये संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी /सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

तरी 46 रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील पात्र मतदारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.