
कुडाळ : एस. के. पाटील शिक्षण मंडळ (पाट) संचलित नेरुर-माड्याचीवाडी माध्यमिक विद्यालयात स. का. पाटील तथा आप्पासाहेब पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संस्थेचे सदस्य महेश ठाकूर, प्रशालाचे मुख्याध्यापक अनंत सामंत शिक्षक राजेंद्र घाडीगावकर व शामसुंदर राणे, शिक्षिका हेमांगी आजगावकर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स. का. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करण्यात आले.
महेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना आप्पा साहेबांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. शिक्षिका हेमांगी आजगावकर यांनी आप्पासाहेबांचा जीवनपट उलगडून सांगितला. प्रशालेतील विशाल गावडे, तन्वी गावडे, रिया खरुडे व दामिनी देसाई या विद्यार्थ्यांनी स. का. पाटीलांविषयी माहिती सांगितली. प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक अनंत सामंत यांनी केले. सूत्रसंचालन शामसुंदर राणे यांनी तर आभार राजेंद्र घाडीगांवकर यांनी मानले.