कुडाळ बाजारपेठेतील आपला दवाखाना बंद...!

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणलं समोर
Edited by:
Published on: July 01, 2024 11:51 AM
views 638  views

कुडाळ : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना योजना सुरू करण्यात आली. माञ, याच प्रश्नावर पावसाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक आणि नितेश राणे यांच्यात खडाजंगी झाली होती. दरम्यान, कुडाळ बाजारपेठेतील आपला दवाखाना बंद असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने समोर आणण्यात आले आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संतोष शिरसाठ, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, बबन बोभाटे, अतुल बंगे, राजू गवंडे गुरुनाथ गडकर आदींनी कुडाळ शहरालगत असलेल्या आपला दवाखाना येथे जात दवाखान्याला लॉक असल्याचे वास्तव समोर आणले.

पावसाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी स्वर्गीय हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना जिल्ह्यात ठीक ठिकाणी उभारण्यात आले आहेत हे सुरू आहेत का असा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना आमदार नितेश राणे यांनी सर्वच दवाखाने सुरू असल्याची माहिती सभागृहात दिली होती. यावर सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कुडाळ शहरातील आपला दवाखान्याला भेट देण्यात आली . यावेळी या दवाखान्याला कुलूप असल्याचे समोर आले. तर या दवाखान्याला कोणतीही वीज जोडणी करण्यात आली नसल्याचे वास्तव ठाकरे गटाच्या वतीने समोर आणण्यात आले. 

यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी महायुती सरकार वर आरोप करत शिंदे गटाने बाळासाहेबांचं नाव चोरले, निशाणी चोरली, तर बाळासाहेबांचं नाव धुळीला मिळविण्याच काम केलं आहे, शाळेची रिकामी इमारत मिळाली तिला रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही, माञ बाळासाहेब ठाकरेंवर आपलं प्रेम असल्याचं दाखवण्यासाठी सर्वत्र दवाखाने सुरू केले, मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनाही फसवण्याचं काम शिंदे गटाने केला असल्याचा आरोप उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केला आहे.