एपीआय सागर खंडागळेची जामिनावर मुक्तता..!

Edited by:
Published on: October 20, 2023 19:30 PM
views 96  views

सिंधुदुर्ग : सावंतवाडी पोलीस स्टेशन येथील लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ व ७ अ अन्वये अटकेत असलेले एपीआय सागर खंडागळे यांना रक्कम रुपये ५०,००० वर मुक्तता करण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश १ तथा विशेष न्यायधीश सिंधुदुर्ग  सानिका जोशी यांनी दिले. एपीआय  खंडागळे यांच्या वतीने अॅड राजेंद्र रावराणे व अॅड  प्राजक्ता शिंदे यांनी काम पहिले.

 तक्रारदार सिद्धांत परब यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभाग रायगड कँम्प सावंतवाडी यांचेकडे एपीआय सागर खंडागळे व पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील हे आपल्याकडे लाचेची मागणी करत असलेबाबत  तक्रार दाखल केली होती.  

 त्यानंतर खंडागळे यांनी एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबधक पथकाने त्यांस अटक केलेली होती. त्यांच्या वतीने जामीन मिळावा यासाठी विशेष न्यायाधीश सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला होता. सदर अर्जावर सुनावणी होऊन श्री.खंडागळे यांना विशेष न्यायालयाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.