
चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंंद जाधव अपरान्त संशोधन केंद्र, चिपळूण ग्रंथालयाच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा गौरवास्पद , अपरान्त भूषण पुरस्कार या वर्षी इन्फिगो आय केअर चे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्रीधर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लेखक आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी असणार आहेत.
हा कार्यक्रम शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४ रोजी , सायंकाळी ६ वाजता , ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृह, चिपळूण येथे होणार आहे. या कार्यक्रमास चिपळूण च्या नागरिकांनी उपस्थित राहावे , असे आवाहन लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.